विशेष प्रतिनिधी
पुणे : Rupali Chakankar राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेल्या रुपाली चाकणकर यांनी आज सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडत, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोपांवर जोरदार प्रतिवाद केला आहे. स्वतःवर आणि कुटुंबावर होत असलेल्या आरोपांना त्यांनी “कपोलकल्पित आणि हेतुपुरस्सर बदनामीचा भाग” असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.Rupali Chakankar
चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेकांवर आरोप झाले, मात्र त्या आरोपांना पुरावेही सादर करण्यात आले होते. परंतु गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्या बाबतीत केवळ बेछूट आरोप होत असून, त्यामागे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. आरोप करणाऱ्यांनी अद्याप पुरावे दिले नाहीत, तसेच प्रसारमाध्यमांनीही ते मागितले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.Rupali Chakankar
या प्रकरणात चर्चेत आलेल्या निनावी पत्रावरही चाकणकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “हे पत्र नेमकं आरोप करणाऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं? त्याची शहानिशा का झाली नाही?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. पोलीस प्रशासनाकडे आलेले हे निनावी पत्र माध्यमांकडे देऊन त्यावर दिवसभर चर्चासत्रे रंगवली गेली, हा एक “कुटील डाव” असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी नवनीत कॉवत यांनी दिलेल्या विधानाचा उल्लेख करत सांगितले की, नाव व पत्ता नसलेल्या निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या कोणतेही महत्त्व नसते, हे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही अशा पत्राच्या आधारे आरोप करण्यात येत असल्याने, हे पत्र कोणी लिहिले आणि ते कुठून आले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
चाकणकर पुढे म्हटल्या की, तर्कवितर्क, अफवा आणि रंजक कथांवर आधारित आरोप करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात आहे. अशा प्रकारे कोणत्याही ठोस पुराव्याविना बदनामी करणे हा एक धोकादायक आणि चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
चर्चेत असलेल्या खरात प्रकरण संदर्भातही चाकणकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. “कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात किंवा इतर कोणत्याही गैरप्रकारात आमचा कोणताही संबंध नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, त्यांनी गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या एकतर्फी बातम्यांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले असल्याचेही स्पष्ट केले. यामागे तपास यंत्रणा आणि SITला निष्पक्षपणे चौकशी करता यावी, हाच उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
Rupali Chakankar’s angry question; Allegation that there is a defamation plot behind the allegations
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..