विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister“एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तुत्वाने मोठा होऊ शकतो, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि लोकशाहीने सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला.Chief Minister
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी पूर्ण होत असून, त्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध विभागाचे मंत्री यांच्यासह गटनेते व सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योगशास्त्रात एम. ए., पत्रकारितेचा अनुभव आणि मराठवाडा विभागात बारावीमध्ये गुणवत्ता यादीत सहावे स्थान मिळवणाऱ्या युवकाने जनतेच्या प्रश्नांची समज, ठाम भूमिका, विविध संस्थांबरोबर सामाजिक, क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य, यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आंदोलने उभारून ती यशस्वी केली.
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आदींनी विरोधी पक्षनेते दानवे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
S.T. Bus driver’s son becomes Leader of Opposition in Legislative Council on the strength of his achievements, Chief Minister praises Ambadas Danve
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला