विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार आहेत, तरीही आम्हाला डावलले गेले. शिष्टमंडळ पाठवताना आमचा विचार करण्यास भाजप तयार नव्हती. शिंदे आणि पवार गटापेक्षा आमचे प्रतिनिधित्व अधिक आहे. ही निवड पक्षीय आधारावर झालेली आहे, देशाच्या हितासाठी नव्हे,” असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
परराष्ट्र दौऱ्यासाठी निवडलेल्या शिष्टमंडळावर टीका करताना त्यांनी भाजपच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले, सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावाखाली भाजपने आपलेच राजकारण पुढे नेले आहे.या डेलिगेशनमध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडीचं कोणी दिसतंय का तुम्हाला ? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातं हे ते कोणत्या आधारावर सांगतात.
हे शिष्टमंडळ म्हणजे सरकारच्या गुन्ह्यांचं समर्थन करण्यासाठी पाठवलेलं ‘वऱ्हाड’ आहे. काश्मीर प्रश्नावर, ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा घ्यायला तुम्ही तयार नाही, आणि परदेशात जाऊन काय सांगणार आहात? परदेशात हाय कमिशन आहेतच, मग खासदारांच्या फौजा पाठवायची गरज काय? असा सवाल करत राऊत म्हणाले की, पंतप्रधान 200 देश फिरले, तरी एक देश तरी आपल्या बाजूने उभा राहिला का? त्यामुळेच आता हे नौटंकी शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. यामागे फक्त एकच हेतू आहे तो म्हणजे मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर परदेशात गुळगुळीत मलम लावणे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी या शिष्टमंडळावर बहिष्कार टाकावा. देशहिताच्या नावाखाली भाजपच्या पक्षहिताचे राजकारण केले जात आहे, हे थांबायला हवे, असे आवाहन त्यांनी केले
Sanjay Raut criticizes all-party delegation for taking decisions in the interest of party, not country
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर