विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut संजय राऊत सर्वात मोठा XXX आहे. मी जाणुनबुजून हे शब्द वापरतोय, कारण ही व्यक्ती त्याच लायकीची आहे. त्याने XXX पणा केल्यामुळे त्यांचा पक्ष संपला, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.Sanjay Raut
मुंबईतील पत्रकार परिषदेत बाेलताना निरूपम म्हणाले की, मी याआधीही सांगितलंय, संजय राऊत हा सर्वात मोठा XXX आहे. अशा XXX लोकांच्या बोलण्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही. त्यांनी XXX पणा केल्यामुळे त्यांचा पक्ष संपला. त्यांनी काँग्रेसला संपवले. त्यांनी शरद पवारांच्या पक्षाच्या संपवले. त्यांच्यामुळेच जे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असल्याचा दावा करतात त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. जनतेने त्यांना नाकारले. त्यामुळे असल्या XXX लोकांच्या विधानावर आम्हाला कुठलीही कमेंट करायची नाहीSanjay Raut
निरुपम म्हणाले, मतचोरीचा आरोप हा राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हचं जाळे आहे. त्या जाळ्यात महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अडकले आहेत. मतदार यादीत सगळे नाव योग्य आहेत, एकही नाव फेक नाही असं आम्ही सांगत नाही. परंतु मतदार यादीत जो काही घोळ, चूक आहे त्यामागे एक मोठा कट आहे. त्यात राजकीय पक्षाचा सहभाग आहे हे म्हणणं चुकीचे आहे. मतदार यादीत याआधीही बऱ्याच चुका होत्या. कधी फोटोंची अदलाबदल होते. कधी नावे बदलली जातात. या तांत्रिक चुका आहेत.
त्याविरोधात बोलायला पाहिजे. निवडणूक आयोगावर दबाव टाकायला पाहिजे. मात्र यात सत्ताधारी पक्षाचे कटकारस्थान आहे. त्यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोग बोगस मतदार तयार करतो, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला ते मतदान करतात हा नॅरेटिव्ह चुकीचा आहे .
Sanjay Raut is the biggest XXX, the party ended because he acted like XXX, Sanjay Nirupam criticizes
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















