विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीच आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, जेव्हा माझ्यावर अटकेची वेळ येत होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मला वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. शिंदे यांनी फोन करून विचारले होते, “अमित शहांशी बोलू का?”, मात्र मी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राऊत पुढे म्हणाले, “मी शिंदेंना तेव्हाच सांगितलं की, तुम्ही कुणाशीही बोला, मी तुमच्या पक्षात येणार नाही. मी पळून जाणारा माणूस नाही, अटक हवी असेल तर करा. माझी मान उडवली तरी मी कधी झुकणार नाही. माझी भूमिका ठाम आहे.”
याचप्रमाणे त्यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. “शिवसेना-भाजप युतीत फूट पडण्याला सर्वस्वी जबाबदार आहेत ते अमित शहा,” असा थेट आरोप त्यांनी केला. “दिल्लीच्या राजकारणात अमित शहा आल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला. स्व. अरुण जेटली यांनीसुद्धा शहा यांना दोनदा समजावलं होतं की, शिवसेनेशी वागण्यात संयम बाळगा. मात्र शहा यांचं काम म्हणजे विरोधकांचा खात्मा करणे हेच राहिलं आहे,” असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी सांगितलं की, “अरुण जेटली रुग्णालयात असताना अमित शहा त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी जेटली यांनी मला स्वतः सांगितले की, ‘शिवसेना हा आपला जुना सहकारी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्याशी संबंध कायम ठेवले पाहिजे.’”
राऊत यांनी भाजप नेत्यांच्या बदललेल्या ओळखीवरही टोला लगावला. “जे आज भाजपमध्ये मोठ्या गड्यांच्या भूमिकेत आहेत, ते त्यावेळी नव्हतेच. नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले तेव्हा मी स्वतः तिथे होतो. त्यावेळीचे फोटो आजही आहेत. पण तेव्हा भाजपमध्ये नसलेली, काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेली मंडळी आता भाजपमध्ये बसून शिवसेना-भाजपच्या नात्याबद्दल बोलत आहेत.”
ईडी अटकेपूर्वीच्या घटनांवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “माझ्या निकटवर्तीय लोकांना त्रास दिला जात होता. मी स्वतः अमित शहांना फोन करून म्हटलं, ‘मी दिल्लीतील माझ्या बंगल्यावर आहे. मला अटक करायची असेल तर करा, पण माझ्या लोकांना त्रास देण्याची नौटंकी थांबवा.’ त्यानंतर लगेच आशिष शेलार यांचा फोन आला. मी त्यांनाही तेच सांगितलं मला त्रास द्या, पण निरपराध लोकांना सोडून द्या. ईडीचे अधिकारी जे काही करत होते, त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिली जात होती.”
Sanjay Raut’s revelation: Eknath Shinde extended a helping hand before his arrest
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?