Sanjay Shirsat मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा वाघांच्या कळपात या, संजय शिरसाट यांची भास्कर जाधव याना थेट ऑफर

Sanjay Shirsat मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा वाघांच्या कळपात या, संजय शिरसाट यांची भास्कर जाधव याना थेट ऑफर

Sanjay Shirsat

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या असे थेट निमंत्रण दिले आहे. Sanjay Shirsat

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हॉट्सॲप स्टेट्‍स ठेवलं आणि कोकणाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. भास्कर जाधव देखील ठाकरेंची साथ सोडणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. आता शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट पक्षात येण्याची ऑफरच दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, भास्कर जाधव यांच्या स्टेटसचा अर्थ काय? हे तुम्ही समजून घ्या. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, हे त्यांना सांगायचं आहे हे भास्कर जाधव म्हणतात मी नाही. त्यामुळे भास्कर जाधवांची मानसिकता झाली आहे की त्यांच्याबरोबर (ठाकरेंबरोबर) काम करणं अशक्य आहे. याबाबत त्यांनी अनेकदा सुचवलं आहे. मात्र, त्यांना काही लोक विनवण्या करत आहेत. त्या लोकांचं भास्कर जाधव ऐकणार नाहीत.

भास्कर जाधव यांच्यासारखा चांगला आमदार म्हणजे ते अभ्यासू आहेत, स्पष्ट बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांना माझं सांगणं आहे की मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघांच्या कळपात या. भास्कर जाधव माझे मित्र आहेत, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते एकदा घेतलेल्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत. त्यांचा त्यांच्या म्होरक्यावर विश्वास राहिला नाही. निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया असते, त्यामुळे त्यासाठी थोडासा वेळ लागतो. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढील महिनाभरात अधिवेशनात फार मोठे बदल झालेले दिसतील”, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

Sanjay Shirsat’s direct offer to Bhaskar Jadhav

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023