विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीला शुभेच्छा दिल्या.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिली. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे.
आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या लवकर बरे होण्याबद्दल पूर्ण खात्री व्यक्त केली. ते म्हणाले, अनेक दिवसांपासून त्यांना भेटण्याचं मनात होतं. आज भेट झाली आणि खूप समाधान वाटलं. संजय आता आधीपेक्षा बरे दिसत आहेत. ते लवकरच राजकीय मैदानात परत येतील आणि नेहमीप्रमाणे आपल्या शब्दांनी आणि भूमिकेने वातावरण तापवताना दिसतील. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर पसरल्याचे दिसून आले.
जरी डॉक्टरांनी संजय राऊत यांना बाहेर न पडण्याचे आदेश दिले असले, तरी 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी डॉक्टरांचा सल्ला बाजूला ठेवत शिवाजी पार्कवर जाऊन अभिवादन केले होते. मास्क लावून आणि सुनील राऊत यांच्या आधाराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले.
Sanjay Will Soon Return to the Battlefield… This Time With a Sword, Says Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















