विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळाचे ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. मात्र ते फार टोकाची भूमिका घेतील असे वाटत नाही म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयमित प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी मान्य केले.
उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याच्या विचारात आहेत. वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वबळाचे संकेत दिले.
दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यांबद्दल शरद पवार म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करण्याच्या अधिकार दोन्ही पक्षांना आहे. परंतु, दोन्ही पक्षांचे मेळावे पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला अधिक लोकांची उपस्थिती होती”.
यावेळी पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या घोषणेबाबत विचारले असता ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. आमच्यात या विषयासह इतर काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाष्य केलं. ते त्यांचं मत आहे. मात्र, त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही”.
आगमी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की “येत्या काही काळात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. मुंबई, संभाजीनगर नाशिक या सर्व महापालिकांमधील आपल्या पदाधिकाऱ्यांशी, तिथल्या आपल्या नेत्यांशी बोलून झालं. सगळ्यांचं म्हणणं आहे की एकटं लढा.,
आपली ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात? ठीक आहे… अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द, तयारी बघू द्या… ज्या भ्रमात आपण राहिलो, त्या भ्रमातून पहिलं बाहेर या….ज्या क्षणी माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.
Sharad Pawar restrained words..
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Donald Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
- Rahul Shewale : दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, राहुल शेवाळे यांचा टोला
- कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या, अजित पवार यांनी फटकारले