विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Gaikwad’ राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असे वातावरण तयार झालेले असताना हिंदीला समर्थन करण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक नेता सेल्फ गोल करून बसला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल बोलताना जीभ घसरल्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर चौफेर टीका होत आहे.Sanjay Gaikwad’
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे बोलताना गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, विषय फक्त हिंदीचा नाही, जगात आज टिकायचे असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या. ते मुर्ख होते का? शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काही मूर्ख होते का? असे आक्षेपार्ह शब्द संजय गायकवाड यांनी वापरले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संजय गायकवाड म्हणाले, आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे. तसेच जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये.
Shinde’s leader committed a self-goal while supporting Hindi! Offensive statement about Chhatrapati Sambhaji Maharaj
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti :