विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे समाज कल्याण मंत्री, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट अडचणीत सापडले आहेत. हॉटेल विट्सच्या वादग्रस्त लिलावप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटांच्या अटी व शर्ती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत.
संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्सच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा विषय आज लक्षवेधी द्वारे विधान परिषद सभागृहात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडला. या खरेदी व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले असून या कंत्राटात सहभाग घेतलेल्या तीन कंपन्यांच्या कंत्राटामध्ये फक्त पाच – पाच कोटीचा फरक आहे. यामुळे या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप दानवे यांनी सभागृहात केला.
राज्य सरकारची या व्यवहारात फसवणूक झाली आहे. या कंत्राट भरलेल्या कंपनीचे मालक सिद्धांत शिरसाट असून त्यांचे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथ पत्रात सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर कसलीच संपत्ती नसल्याचे नमूद करण्यात आले असल्याचेही दानवे यांनी निर्दशनास आणून दिले.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
राज्य सरकारचे अधिकारी ही निविदा प्रक्रिया करण्यासाठी काम करतात. जी कंपनी नोंदणी नोंदणी कृतच नाही, कंपनीने मागील तीन वर्षांचा आरटीआर भरलेला नाही, सिद्धांत शिरसाट यांच्या वडिलांच्या शपथ पत्रात सिद्धांत शिरसाट यांची मालमत्ता शून्य असेल तर ते हॉटेल कसे काय घेऊ शकतात? असे प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले.
या आरोपांवरून विधानपरिषदेत प्रचंड गोंधळ उडाला. “सभापती न्याय द्या!” अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही सदस्यांनी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करत संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आणि पारदर्शक चौकशीची हमी दिली.
त्यानंतर स्वत: संजय शिरसाट यांनी विरोधकांवर पलटवार करताना, “दलाली करण्यापेक्षा ऐकून घ्या,” असे संतप्त शब्द वापरले. मात्र, विरोधकांनी याला आक्षेप घेतला की, मंत्र्यांना अचानक बोलण्याची परवानगी नसते. शिरसाट पुढे म्हणाले की, “माझं नाव सभागृहात घेतलं गेलं, म्हणून उत्तर देणं आवश्यक होतं. 160 कोटी, 200 कोटी म्हणणाऱ्यांनीच खरेदी करायची होती ना!”
धनदा कॉर्पोरेशनच्या मालकीचे हॉटेल‘विट्स’ खरेदीसाठी केलेली लिलाव प्रक्रिया अखेर रद्द झाली आहे. कारण सर्वाधिक बोली लावणाऱ्या सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने मुदतीत 25 टक्केरक्कम भरलेली नाही. परिणामी, प्रशासनाने लिलाव अमान्य करत न्यायालयाला या संदर्भातील अहवाल देण्याचे आहे. या लिलाव प्रक्रियेत सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लाइज कंपनीने ६४ कोटी ८३ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. त्यानंतर प्रशासनाने नियमानुसार २५ टक्के रक्कम एका महिन्यात भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, या प्रकरणात विरोधकांकडून अनेक आरोप झाल्यानंतर २० जून ही अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही कंपनीकडून एक रुपयाही भरला गेला नाही. त्यामुळे नियमांनुसार लिलाव रद्द केला आहे. या लिलावावर सुरुवातीपासूनच राजकीय वादंग सुरू होते. कारण संबंधित कंपनी ही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्राची असल्याचे उघड झाल्यानंतर विरोधकांनी लिलाव प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Shinde’s minister Sanjay Shirsat in trouble over Wits’ Hotel case, Chief Minister Devendra Fadnavis orders high-level inquiry
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी