विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नव्याने प्रकाशित होत असलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकामुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासातील काही गूढ आणि अद्याप अज्ञात असलेल्या घटनांचा उलगडा या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदी-शहा यांना संकटातून कसे वाचवले, याचे तपशीलवार वर्णन यात आहे.
पुस्तकातील ‘राजा का संदेश साफ है’ या प्रकरणात अमित शहा यांच्यावरील गुजरात दंगल प्रकरणातील सीबीआय चौकशी, त्यानंतरची तडीपारी आणि या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली मदत याविषयी उल्लेख आहे. शहा यांना तडीपारीवरून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतः मातोश्रीवर येऊन विनंती केल्याचा, आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एका फोनद्वारे हे संकट कसे दूर केले, याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे, नरेंद्र मोदी यांच्याही विरोधात गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू होत्या. या वेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोदींच्या बाजूने भूमिका घेऊन त्यांना अटक होऊ न देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.
एक प्रसंग सांगताना राऊत म्हणतात की, लहान मुलगा जय शहा याला घेऊन अमित शहा मुंबईत आले होते, पण मातोश्रीच्या गेटवरच त्यांना थांबवले गेले. अनेक तास वाट पाहूनही भेट न मिळाल्याने ते घामाघूम झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना संध्याकाळची वेळ मिळाली आणि त्या भेटीत त्यांनी “हिंदुत्वासाठी केलेल्या कार्याचीच आम्ही शिक्षा भोगतो आहोत,” अशी भावनिक व्यथा बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली.
या साऱ्या मदतीनंतरही, संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, अमित शहा यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी राजकारणात पुढे जाऊन निर्घृणपणे वर्तन केलं. जे लोक त्यांच्या उभारीला कारणीभूत ठरले, त्यांच्याच विरोधात त्यांनी निर्णय घेतल्याचा आरोपही या पुस्तकात स्पष्टपणे करण्यात आला आहे. या पुस्तकात आजवर चर्चेत न आलेले अनेक संदर्भ समोर आले असून, येत्या काळात हे पुस्तक राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Shocking revelations on Modi-Shah relations from Sanjay Raut book ‘Heaven in Hell’
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?