विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray अशोक खरात याला भेटणाऱ्यांना सहआरोपी करायचे असेल, तर मग त्या काळात या भोंदूबाबाला संरक्षण देणारे, त्याच्यासाठी शासन निर्णय काढणारे आणि सुविधा पुरवणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारमधील नेत्यांनाही सहआरोपी करायचे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.Uddhav Thackeray
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून भाजप आणि ठाकरे गट यांच्यात तीव्र वाद रंगला आहे. ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “अशोक खरातला भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा” अशी मागणी करताच भाजपने आक्रमक भूमिका घेत पलटवार केला आहे.Uddhav Thackeray
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “Uddhav Thackeray
बन म्हणाले की, दुष्काळाच्या काळात सामान्य जनता पाण्यासाठी त्रस्त असताना या भोंदूबाबासाठी विशेष शासन निर्णय काढून पाणीपुरवठा करण्यात आला होता. “हा केवळ साधा संपर्क नव्हता, तर सत्तेचा वापर करून त्याला मदत करण्यात आली होती.
इतकेच नव्हे तर, अशोक खरातवर 2003 मध्येच गुन्हा दाखल झाला होता. तरीही पुढील 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार आणि नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्या काळात कारवाई का झाली नाही? कोणाचा दबाव होता?” असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
फडणवीस सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत बन यांनी सांगितले की, “आमच्या सरकारने कोणालाही वाचवले नाही. आरोप गंभीर असल्यामुळे चौकशी सुरू केली आणि कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.”
दरम्यान, या प्रकरणामुळे ठाकरे गटात अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. नवनाथ बन यांनी सांगितले की, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात मतभेद वाढले असून, यामुळेच राऊत यांनी मुंबईतील खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजेरी लावली.
“Should Uddhav Thackeray Also Be Named Co-Accused?” BJP Hits Back at Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- स्किल इंडिया’मध्ये महाराष्ट्राची आघाडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Tirupati : देशाच्या टॉप-10 मंदिरांजवळ ₹9 लाख कोटींची संपत्ती; तिरुपती बालाजी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळ
- ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा
- पुणे मेट्रो आता कात्रज घाट ओलांडून आता थेट शिवापूरला धावणार ?