विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLA Santosh Bangar “ज्या मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यांना घरचा रस्ता दाखवा,”अशी मागणी हिंगोलीचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे.MLA Santosh Bangar
नांदेड आणि सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकांमध्ये शिवसैनिकांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांविरोधात संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.MLA Santosh Bangar
नांदेड येथे शिवसेना शिंदे गटाच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली, मात्र यावेळी त्यांचे लक्ष्य विरोधक नसून स्वपक्षीय मंत्री होते. संतोष बांगर म्हणाले, “काही मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. हे मंत्री उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीत की त्यांची कामे करत नाहीत. अशा अहंकारी मंत्र्यांना वेळीच घरी पाठवा, तरच पक्ष टिकेल.” यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच बांगर यांनी हा ‘घरचा आहेर’ दिला.
शिवसेनेने सोलापूर येथे आयोजित धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीतही मोठा राडा पाहायला मिळाला. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायाचा पाढा वाचला. “नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधले जात आहे,” असा खळबळजनक आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. तुळजापूर, कळंब आणि धाराशिवमध्ये पक्ष संघटनेची गळचेपी होत असून भाजप वरचढ ठरत असल्याची भावना सैनिकांनी व्यक्त केली.
Show the door to ministers who have become arrogant, demands MLA Santosh Bangar
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..