विशेष प्रतिनिधी
मुंबई: CM announces राज्यात स्मार्ट पोस्टपेड वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 27,826 फिडर मीटर आणि 38 लाख ग्राहक मीटर बसवण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर ऊर्जेच्या तासांदरम्यान वीज बिलात 10 टक्के सवलत दिली जात आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, राज्यात प्रथमच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.CM announces
विधानपरिषद सदस्य सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात सूचना मांडली. या संदर्भात झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेतील चर्चेत सदस्य अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशातील जवळपास सर्व राज्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवत आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 29 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, त्यापैकी चार वेगवेगळ्या कंपन्यांना काम देण्यात आले आहे. आपल्या राज्यातील विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवणे अनिवार्य नाही आणि या मीटरमध्ये प्रत्येक युनिटची गणना स्वयंचलित असल्याने, वीज बिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोळीवाडे आणि वन जमिनीवरील ग्राहकांना वीज पुरवठा करण्याच्या योजनेबाबत सर्व संबंधित विभागांची एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल आणि ती न्यायालयासमोर सादर केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राज्यात १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर १७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. यामुळे ९५ टक्के घरगुती ग्राहकांना वीज दर कपातीचा थेट लाभ मिळेल. स्मार्ट मीटर बसवले तर दिवसा वापरलेल्या विजेवर १० टक्के सवलत मिळेल. मुख्यमंत्री कृषी वाहिनी प्रकल्पाअंतर्गत २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज उपलब्ध होईल.
Smart postpaid meters will provide 10 percent discount on electricity bills, CM announces
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी