विशेष प्रतिनिधी
Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री हाेण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केल्याने राजकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले, तर भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात होतील. हे त्यांना स्वतः अमित शाह यांनी सांगितले आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
आता मलाही वाटते की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठे जमते. कधी ना कधी तो योगही जुळून येईल, नाही असे नाही, असे विधान अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केले हाेते. यावर संजय राऊत म्हणाले अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. योग कसा येणार? मी नेहमी सांगतो की, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शिवसेनेत असते, तर मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते, तर पुन्हा शिवसेनेतूनच मुख्यमंत्री झाले असते. मनोहर जोशी झाले ना. ते पक्षासोबत राहिले. जोपर्यंत वेगळा गट आहे, तोपर्यंत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला, तर भविष्यात भाजपाचा चेहरा म्हणून संधी मिळू शकते. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल.
राऊत म्हणाले, अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात. एक भाजपा, दुसरा एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि तिसरा अजित पवारांचा पक्ष. अमित शाह यांच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असतील, तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे. ज्या अमित शाह यांनी महाराष्ट्र तोडण्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित पक्ष तोडले. अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांचा सत्कार करणार का, अजिबात नाही. आम्ही अमित शाह यांच्या कार्यक्रमाला जाणार नाही.
So Ajit Pawar, Eknath Shinde can become Chief Minister, Sanjay Raut claims
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती