विशेष प्रतिनिधी
मुंबई : MPSC Examination महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या विजय नागनाथ लामकाने याने सर्वसाधारण आणि मागासवर्गीय गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये सोलापूरचीच आरती परमेश्वर जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.MPSC Examination
विजय लामकाने याने राज्य सेवा मुख्य परीक्षेत ६२४ गुण मिळवत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. त्याला उपजिल्हाधिकारी हे प्रतिष्ठेचे पद मिळाले आहे. आरती जाधव हिने ६०१ गुणांसह महिलांच्या गटातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.MPSC Examination
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२४ – अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/VQ45ORd2xFhttps://t.co/4mfWCTvjhBhttps://t.co/h76NBDFQF0
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 8, 2026
एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालानुसार एकूण २० विविध संवर्गांतील ४६१ पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आयोगाने निकालासोबतच प्रत्येक प्रवर्गातील शिफारसपात्र शेवटच्या उमेदवाराचा ‘कट-ऑफ’ (सीमांकन गुण) देखील जाहीर केला आहे.
Solapur’s Vijay Nagnath Lamkane Tops MPSC Examination
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर