विशेष प्रतिनिधी
मुंबई – Vijay Wadettiwar राज्य सरकारने काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर जी भूमिका मांडत आहेत तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी. ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार, कधी करणार असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांचा आमदार तिथे होता म्हणून लाठीमार केला का. लाठीमार करुन हिरो कोणाला व्हायचे होते, असाही सवाल त्यांनी केला.Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा असे आवाहन भुजबळ करत असतील तर मग सरकारच पडले पाहिजे, असे सांगत ते म्हणाले की, सरकारचे मंत्री जरांगेंच्या भेटीला गेले होते. त्यांना पाडायचे तेव्हा पाडा, पण आज ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा शासन निर्णय कोण रद्द करणार हे सांगा.Vijay Wadettiwar
वडेट्टीवार म्हणाले की, जरांग यांच्या मंचावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गेले होते. एकीकडे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात, दुसरीकडे सरकारच्या निर्णयावर टीका करायची, हा दुटप्पीपणा आहे. ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागत नाही तर सरकारने सर्व नेत्यांना बोलवावे, चर्चा करावी. ओबीसींचे काय नुकसान होत आहे, हे तेव्हा आम्ही पुरावे देऊन सांगू, असेही वडेट्टीवार म्हणाले.
महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा पुन्हा वाद वाढला आहे. शाळांमधून विद्यार्थ्यांना काढले जात आहे. इतका दोन समाजात द्वेष पसरला आहे. या सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, पण जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहे, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.
पडळकर कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहे?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. पडळकर यांनी जी टीका केली ती म्हणजे आईला शिवी दिली आहे. राजकीय पुढाऱ्यांवर टीका करा, पण त्यांच्या आई वडिलांवर बोलणे, अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडत आहे. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहे, कोण त्याला पाठीशी घालत आहे, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Speak outside and speak in the cabinet meeting, Vijay Wadettiwar challenges Chhagan Bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!