पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागा, अजित पवारांच्या नेत्याचा राज ठाकरे यांना सल्ला

पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागा, अजित पवारांच्या नेत्याचा राज ठाकरे यांना सल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी घेतलेल्या या मेळाव्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालावर संशय व्यक्त केला. शरद पवार साहेबांचे ८ खासदार निवडून आले. त्यांचे १० आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे ४१ आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? अशी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे, अशी टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या विधानावर मिटकरी म्हणाले, राज ठाकरेंना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यामुळे विधानसभेला स्वत:च्या घरात झालेल्या दारुण पराभवानंतर दीड महिन्यांनी ४२ जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसलाय. मात्र आपल्या सुपुत्राचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत, यावर त्यांनी भाष्य करावं. यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे”, असे अमोल मिटकरी म्हणाले.

वरळीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकारे म्हणाले होते की, महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला. भाजपला १३२ जागा मिळाल्या. त्याआधी १०६ होत्या. त्या आधी १२२ जागा होत्या. ठिक आहे, समजू शकतो. अजित पवार ४२ जागा. चार पाच जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार यांना ४२ जागा मिळतात.

कुणाचा तरी विश्वास बसेल का. जे इतकी वर्ष राज्यात राजकारण करत आले. अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जिवावर मोठे झाले त्या शरद पवार यांना १० जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. ४ महिन्यापूर्वी लोकसभा झाली. सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे आले. १३ खासदार आले. एका खासदाराखाली पाच ते सहा आमदार येतात. किती आमदार काँग्रेसचे यायला हवे होते. सहा ते सहा नाही पकडलं. तीन किंवा चार पकडले. त्यांचे १५ आमदार येतात.

शरद पवार साहेबांचे ८ खासदार निवडून आले. त्यांचे १० आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे ४१ आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात?

Start work from 5 am, Ajit Pawar’s leader advises Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023