विशेष प्रतिनिधी
मुंबई : State Election Commission राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या संगणकीय प्रणालीत (सॉफ्टवेअर) तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) प्रसिद्ध होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या आता विलंबाने जाहीर होणार आहेत. त्यामुळे या याद्या प्रसिद्ध करण्यास आयोगाकडून मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.State Election Commission
केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्येही तांत्रिक ‘घोळ’ झाल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.State Election Commission
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार होत्या. ८ ऑक्टोबरला प्रारुप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, तर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकतींचे २६ ऑक्टोबरपर्यंत निराकरण करून, २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम याद्या प्रसिद्ध होणार होत्या.
पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांचा देखील यात समावेश आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ अखेरपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
सध्या राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्या यांचा कार्यकाळ अनुक्रमे २० आणि १३ मार्च २०२२ रोजीच संपला असून, त्यानंतरपासून प्रशासक चालवत आहेत. आता आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपला आहे.
या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ३० ऑक्टोबर (गुरुवार) रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक आचारसंहिता, कार्यक्रम जाहीर करण्याचे वेळापत्रक आणि इतर तांत्रिक बाबींचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
Technical Glitch in State Election Commission’s Software; Final Voter Lists to Be Delayed
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















