विशेष प्रतिनिधी
मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला कामगारांच्या वारसांकडून तीव्र विरोध झाला होता. यामुळे गेल्या आठवड्यात गिरणी कामगारांच्या वारसांनी मोर्चा काढून मुंबईतच घरे देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक झाली. त्या बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी मुंबईतच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (SRA) काही घरे राखीव ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. mill workers in Mumbai,
आज विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला थेट प्रश्न विचारला. “गिरणी कामगारांच्या वारसांना मुंबईत कुठे आणि केव्हा घरे देणार?” यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर माहिती दिली.
उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, २०१९ पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार, मुंबईतील गिरणीच्या जमिनीबाबत कलम ५८ आणि नवीन डीसीपीआर (कलम ३५) नुसार, गिरणीची जमीन तीन सम भागांत विभागण्याचे बंधनकारक आहे. एक तृतीयांश जमीन बागा आणि क्रीडांगणासाठी महापालिकेला, एक तृतीयांश जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी, उर्वरित एक तृतीयांश जमीन मालकासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
या नियमानुसार आतापर्यंत सुमारे १३,५०० घरे गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आली आहेत. उर्वरित जमिनीवर काम सुरू असून, कामगारांसाठी अधिक घरे उभारण्याचे नियोजन सुरू आहे.
विशेषत: खटाव मिलच्या प्रकरणात, १०,२२८.६९ चौरस मीटर जमीन मुंबई महापालिकेला हस्तांतरित केली जाणार असून, तितकीच जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाईल. या जमिनीवरून ९०० ते १,००० घरे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले की, काही मिल मालकांनी अद्याप त्यांची ‘वन थर्ड’ जमीन शासनाला दिलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये ती जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जर मुंबईत आवश्यक तेवढी जागा उपलब्ध झाली नाही, तर ठाणे, वसई-विरार परिसरात गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात येतील, असे आश्वासनही सामंत यांनी दिले.
State government considering providing houses for mill workers in Mumbai, Thane, Vasai-Virar
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला