विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde निवडणुका संपल्या, आता संघटना उभारणीच्या रणांगणात उतरा असे आवाहन देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेवर मोठी जबाबदारी टाकली. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवत संघटना भक्कम करा आणि तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा संदेश त्यांनी वरळीतील राज्यव्यापी मेळावा( महायुवोत्सवात) दिला. “आम्ही चालतो ती वाट, आम्ही रचतो तो इतिहास; भगवा आमच्या रक्तात आणि श्वासात आहे,” असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिस्तीचा ठसा प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यात दिसलाच पाहिजे, असे सांगितले.Eknath Shinde
शिंदे म्हणाले “माझ्यासमोर युवा सेनेचे वाघ आणि युवती सेनेच्या वाघिणी बसल्या आहेत. युवा सेना ही केवळ संघटना नसून एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या युवा सेनेने मराठी माणसाच्या हक्क, न्याय आणि रोजगारासाठी काम करावे.Eknath Shinde
तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असते, असे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर आणि भगतसिंग यांच्या उदाहरणांचा उल्लेख केला. “जोपर्यंत लक्ष्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका; मेहनत आणि संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही,” असा संदेश त्यांनी दिला. आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगितला. अनेक संकटे, वादळे आणि दुःखांचा सामना करूनही ते खचले नाहीत. 2022 मधील उठावानंतर शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिली आणि जनतेनेच खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध केले, असे त्यांनी सांगितले. “40 पैकी एक जरी आमदार निवडून आला नसता तर शेती करायला गेलो असतो; पण 60 उमेदवार हे आमदार निवडून आले,” असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी युवा सेनेवर असल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. देशातील 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील असल्यामुळे भारत हा तरुणांचा देश असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आर्थिक महासत्तेकडे नेत असून तरुणांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री असताना “पायाला भिंगरी लावून” संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, असे सांगत त्यांनी विविध योजना राबवल्याचा उल्लेख केला. “लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ” ही ओळख माझ्यासाठी मोठी असल्याचे सांगत त्यांनी संपत्तीपेक्षा माणसे कमावणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. तसेच कार्यकर्त्यांना “तहान-भूक विसरून काम करा” असा संदेश देत त्यांनी लोकांमध्ये जा, त्यांच्या समस्या समजून घ्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि त्यांच्या अश्रूंना हात द्या, असे आवाहन केले.
Step into organisational battle, Eknath Shinde urges yuva sena
महत्वाच्या बातम्या