विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLA Chitra Wagh अभिनेता एजाज खान याचा ‘हाऊस अरेस्ट’ हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळे रान देणे थांबवा. एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे.MLA Chitra Wagh
चित्रा वाघ यांनी x या सोशल मीडिया अकाउंटवर हाऊस अरेस्ट कार्यक्रमाची क्लिप शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा शो निव्वळ कंटेंट नाही, तर समाजाच्या मूल्यांवर आघात हाऊस अरेस्ट शो बंद करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
वाघ यांनी म्हटले आहे की, स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. हे क्लिप्स सोशल मीडियावर फिरत आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे.
ही समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. मी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
ओटीटी वेब सीरिज ‘हाउस अरेस्ट’मधील सुमारे दोन मिनिटांची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक एजाज खान हा होस्टच्या भूमिकेत दिसत असून, तो रिअॅलिटी शोदरम्यान एका स्पर्धकाला कामसूत्रातील विविध लैंगिक आसनांबाबत विचारताना दिसतो. त्यानंतर तो इतर स्पर्धकांना त्या आसनांचे (पोजिशन्स) प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगतो.
या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारने या स्ट्रीमिंग अॅपवर अद्याप बंदी का घातलेली नाही, असा सवाल केला आहे. याशिवाय भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “हे सगळं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही.”
Stop giving free rein to obscenity. Ban Ejaz Khan’s ‘House Arrest’ show, demands BJP Legislative Council MLA Chitra Wagh
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती