Sushma Andhare : सुषमा अंधारे अजित पवार गटात जाण्याचा गाैप्यस्फाेट अन् अंजली दमानिया यांच्यासाेबत टि्वरवाॅर!

Sushma Andhare : सुषमा अंधारे अजित पवार गटात जाण्याचा गाैप्यस्फाेट अन् अंजली दमानिया यांच्यासाेबत टि्वरवाॅर!

Sushma Andhare

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sushma Andhare सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा एका ग्रुपवर केला. त्यांच्या या दाव्यानंतर आता सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यात टि्वटर वाॅर पेटले आहे. चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांना दिला आहे.Sushma Andhare

सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी एका ग्रुपवर उपस्थित केला होता. या संदर्भातील फोटो ट्वीट करताना सुषमा अंधारे भडकून म्हणाल्या होत्या की, अहो दमानिया, जरा दमानं घ्या की…, किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस… कधीतरी पूर्ण, महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला. ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही माझ्या पीआर म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

अंजली दमानिया यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना टि्वट करताना म्हटले की, केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? छान… असो… पण मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे. खरंतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले. मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की, तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे की नाही, यावर तुम्ही खरं उत्तर द्याल का?

जर मला बातमी करायची असती तर मी तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. आणि हो प्रकाश झोतात यायची मला गरज नाही. प्रकाशझोतात ज्यांना यायचं असत ते वाट्टेल ते करतात… त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाट्टेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात, हे मला या जन्मी जमणार नाही, असा टोला लगावतानाच अंजली दमानिया म्हणाल्या की, तुमच्या माहितीसाठी, काल एका चैनलने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार, यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्रॉडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला.

अंजली दमानिया यांच्या स्पष्टीकरणानंतर सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, दमानिया तुम्ही आडनाव बघून अजेंडे चालवता हे वास्तव आहे. ठाकरे-पवार यांना लक्ष्य करताना नागपूर आणि परिसरातील फडणवीस, बावनकुळे व मुनगुंटीवार यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल? असो, ज्यांच्या पे रोलवर तुम्ही काम करता त्यांच्याकडून नीट माहिती घ्या. परंतु चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल.

Sushma Andhare’s secret to join Ajit Pawar’s group and tweeterwar with Anjali Damania!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023