विशेष प्रतिनिधी
बीड : मराठा द्वेषातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लातूरमध्ये छावा संघटनेचे नेते विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाली. तटकरे हे रविवारी लातूर दौऱ्यावर आले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकत सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषि मंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. छावाचे कार्यकर्ते बाहेर येताच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घाडगे पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणावरून अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
यावर बोलताना जरांगे म्हणाले, हा हल्ला तटकरे साहेबांनीच घडवून आणला आहे, अशी आमची शंका आहे. हा घडवून आणलेला, पूर्वनियोजित प्रकार आहे. यामध्ये मराठा समाजाविषयी असलेला द्वेष स्पष्टपणे दिसतो. विजयभैय्या हे शेतकऱ्यांचे लेकरू आहे. ते जर आज मागणी करायला गेलेत तर तुम्ही त्यांना मारता. म्हणजे हे तुम्हाला सोपे जाणार नाही. अजित दादांनी कठोरात कठोर कारवाई करून केवळ पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हाकालपट्टी केली पाहिजे.
जरांगे म्हणाले, “हे लोक अजितदादांवरही काळे फासण्याचे काम करत आहेत. अजित पवारांचा राज्यात जनाधार वाढतो आहे, तरुण त्यांच्यामागे उभे राहत आहेत. पण काही नाकर्ते, अतिरेकी कार्यकर्ते जर पक्षाच्या पदांवर राहिले, तर त्याचा फटका थेट अजितदादांना बसतो. असे लोक पदावर ठेवण्याच्या कामाचे नसतात.कुठल्याही मंत्र्याने आपल्या पदाची गरिमा राखली पाहिजे. कोकाटे साहेबांनी आपल्या स्वभावात बदल करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर शेतकरी वर्ग त्यांच्या अंगावर जाईल. पुढच्या काळात देखील त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागेल.”
Tatkare carried out the attack on the camp workers out of Maratha hatred, alleges Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला