विशेष प्रतिनिधी
Mumbai News : दोन्ही पवार एकत्र येण्याला राष्ट्रवादीतूनच विरोध आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पवार काका पुतणे एकत्र येण्यासाठी विरोध आहे,’ असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
गेल्या काही काळापासून शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे. पुण्यातील अनेक कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एकाच मंचावर दिसून आले आहेत. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
राऊत म्हणाले, “शरद पवार यांच्या विचारावर आमचा पक्ष चवालतो असे अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून सांगितले जाते. एकत्र यावे असे त्यांच्याकडून म्हटले जाते. पण जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते तेव्हा ते एकत्र येत नाही. मोदी आणि शहा यांच्या मुख्य दुकानासोबत त्यांना आपले दुकान चालवायचे आहे. प्रत्येक जण आपला राजकीय फायदा पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काही मोठे नेते नाही, हे सर्वांना माहिती आहे. तटकरे हे एका गटाचे अध्यक्ष आहे, तो जर विलिन झाला तर अध्यक्ष बदलावा लागेल, तसे होणार नाही. केंद्रातील मंत्रिपदाचा प्रश्न निर्माण होणार आहेत. प्रत्येक जण आपली व्यवस्था आपली सोय करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे एका मुलाखतीमध्ये कौतूक केले होते. यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार हे या सर्वांपेक्षा मोठे आहेत. देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या कौतुकाने पवार मोठे होत नाहीत. ते मोठेच आहेत, पहाड आहे तो. सह्याद्री आहे. देवेंद्र फडणवीस कौतुक करत आहेत किंवा अमूक कोणी करत आहेत याने त्यांची उंची वाढत नाही. ते टोलेजंग व्यक्तिमत्व आहे.