Thane Metro : ठाणे मेट्रोची ट्रायल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन

Thane Metro : ठाणे मेट्रोची ट्रायल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन

Thane Metro

विशेष प्रतिनिधी

ठाणे : Thane Metro मेट्रोसाठी मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती यासाठी अनेक अडचणीतून मार्ग काढत डेपोकरता जागा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.



मेट्रो 4 प्रकल्पातील वडाळा-घाटकोपर-कासारवडवली आणि मेट्रो 4 अ मधील कासारवडवली ते गायमुख या ठाण्यातील मेट्रो मार्गिकेवर ट्रायल झाली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणेकरांचे अभिनंदन करताना म्हणाले , हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जवळपास सरकार 16 हजार कोटी यासाठी सरकार खर्च करत आहे. 58 किलोमीटरचा हा देशातील सर्वात मोठा मार्ग असणार आहे, पुर्व पश्चिम तसेच मुंबई शहराला जोडणारा मार्ग आहे. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक नियमीत होणार आहे. या मेट्रोचे पुढचे सर्व टप्पे लवकरच पुर्ण होतील असे आमचे प्रयत्न असणार आहेत. Thane Metro

या महत्वाच्या मेट्रो मार्गाचे टेस्टिंग आज आम्ही करत आहोत. हा मार्ग अत्यंत महत्वाचा अजून या मेट्रोची लांबी जवळपास 35 किलोमीटर आहे. 16 हजार कोटी याकरिता खर्च करण्यात येत आहेत. या मार्गावर 8 डब्यांची मेट्रो धावणार आहे. पूर्वउपनगरे, पश्चिम उपनगरे, ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा महत्वाचा मार्ग होणार आहे. ठाणे मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून जवळपास 21 लाख लोक प्रवास करणार आहे. या मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 टक्के कमी होणार आहे. रस्त्यावरील वाहतूक देखील यामुळे नियमित होणार आहे. मला आनंद आहे की, हा महत्वाचा टप्पा आज होत आहे आणि टप्या टप्याने पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत याचे सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले झाले पाहिजेत, अशाप्रकारचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. Thane Metro

एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे शहरात मेट्रोला मंजुरी देणे व्यवहार्य होणार नाही असे काँग्रेसच्या कालखंडात आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस येताच ठाण्यात मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पहिली ट्रायल रन देखील पार पडणे हे अभिमानास्पद आहे. यापूर्वी या मेट्रोच्या मागणीसाठी माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे निलंबन झाले होते. आज त्याचं ठाण्यात मेट्रो धावत असल्याचे पाहून आनंद आणि समाधान वाटत आहे. Thane Metro

आता वडाळा ते कासारवडवली – गायमुख आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा ५८ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग पुढील दीड वर्षात पूर्णपणे कार्यरत झाल्यावर स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच हा मेट्रो मार्ग पुढे गायमुख ते मीरा भाईंदर या मेट्रो – १० मार्गाला जोडला जाणार असून भविष्यात मुंबई शहरात मेट्रोचा हा लूप तयार होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास गतिमान होणार असून वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता होणार आहे.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, भाजप जिल्हा अध्यक्ष ॲड.संदीप लेले तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Thane Metro

Thane Metro trial, Chief Minister Devendra Fadnavis congratulates Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023