Devendra Fadanvis : परदेशी शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण; ‘एज्यु सिटी’साठी आठ हजार कोटींचे करार, चित्रपटसृष्टीलाही नवी चालना

Devendra Fadanvis : परदेशी शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण; ‘एज्यु सिटी’साठी आठ हजार कोटींचे करार, चित्रपटसृष्टीलाही नवी चालना

Devendra Fadanvis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadanvisमहाराष्ट्र सरकारच्या दूरदृष्टीने आकाराला येणाऱ्या ‘एज्यु सिटी’ प्रकल्पामुळे परदेशी शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न आता देशातच पूर्ण होणार आहे. व्हेज जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण परिषदेत एकूण ८,००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoUs) साकारले गेले. शिक्षण, चित्रपटसृष्टी आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमी यामध्ये महाराष्ट्राची आघाडीची भूमिका या करारांमुळे अधोरेखित झाली आहे.Devendra Fadanvis

या ऐतिहासिक करारांमुळे महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या शिक्षण व मनोरंजन हब म्हणून उदयास येणार आहे. ‘ही परिषद केवळ करारांपुरती मर्यादित नसून राज्याच्या उद्योग, शिक्षण आणि क्रिएटिव्ह क्षेत्राला गती देणारा मैलाचा दगड ठरली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘एज्यु सिटी’ प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांच्या दर्जाचे शिक्षण देशातच मिळणार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून या प्रकल्पातून जागतिक विद्यापीठांचा थेट सहभाग हे उदाहरण ठरणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “आज आपण सर्वोत्तम संस्था घडवून सर्वोत्तम राष्ट्र उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. एज्यु सिटी आणि क्रिएटिव्ह स्टुडिओज हे भविष्यासाठी गेमचेंजर ठरतील. गोदरेज आणि प्राईम फोकससारख्या विश्वासार्ह ब्रँड्सच्या सहभागामुळे महाराष्ट्राचे चित्रपटसृष्टीतील नेतृत्व अधिक मजबूत होईल. शासन या सर्व प्रकल्पांना पूर्ण सहकार्य देईल.”

सिडकोमार्फत दोन जागतिक विद्यापीठांशी करार

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सिडकोने युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (UK) यांच्याशी प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. हे दोन्ही विद्यापीठ नवी मुंबईतील एज्यु सिटीमध्ये आपले कॅंपस सुरू करणार आहेत. या करारांवर सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, UWA च्या वतीने डॉ. डायने स्मिथ-गॅंडर आणि यॉर्क युनिव्हर्सिटीच्या वतीने चार्ली जेफ्री यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

चित्रपटसृष्टीसाठी भव्य स्टुडिओ आणि रोजगार निर्मिती

शिक्षणाबरोबरच महाराष्ट्रातील चित्रपट व मनोरंजन क्षेत्रालाही मोठा बूस्ट देण्याची योजना आखण्यात आली आहे. उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनीसोबत ३,००० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. जागतिक दर्जाच्या स्टुडिओची निर्मिती यामध्ये होणार असून यामुळे थेट २,५०० लोकांना रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल.

त्याचप्रमाणे गोदरेज ग्रुपसोबत पनवेलमध्ये ‘AA स्टुडिओ’ उभारण्यासाठी २,००० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा ५०० कोटींचा असून २०२७ मध्ये सुरू होईल. त्यात ६०० रोजगार, तर दुसऱ्या टप्प्यात १,५०० कोटींच्या गुंतवणुकीतून १,९०० अतिरिक्त रोजगार निर्माण होतील. एकूण २,००० कोटींच्या गुंतवणुकीतून २,५०० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

या करारांवर उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, प्राईम फोकसचे नमित मल्होत्रा, आणि गोदरेजच्या वतीने हरसिमरण सिंग यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

‘निफ्टी WAVES इंडेक्स’चा शुभारंभ

WAVES SUMMIT दरम्यान NSE Indices Ltd. ने ‘निफ्टी WAVES इंडेक्स’ चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केले. यामध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत. भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी हे एक नवसृजनशील व्यासपीठ ठरणार असून या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दरवाजे खुले होतील, असा विश्वास NSE चे CEO आशिषकुमार चौहान यांनी व्यक्त केला.

The dream of foreign education will come true; Rs 8,000 crore contract for ‘Edu City’, a new boost for the film industry

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023