विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीबाबत सुरु झालेल्या वादात आता शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट भाजपवर सडकून टीका केली आहे. “हिंदी भाषा लादण्याचा एक छुपा अजेंडा राबवला जात आहे,” असा आरोप करत त्यांनी भाजपवर मराठी द्वेष पसरवण्याचा आरोप केला आहे. Aditya Thackeray
या मुद्द्यावर आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता शिवसेना ठाकरे गटही पूर्ण ताकदीनिशी विरोध करत आहे.
आदित्य ठाकरे यांनी एका ट्विटद्वारे भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेची सक्ती करणाऱ्यांना नक्कीच विरोध आहे! मराठी माणूस याविरोधात पेटून उठला आहे. हे लक्षात येते का की मागच्या दाराने भाजप मराठी द्वेष्टे अजेंडा राबवत आहे?”
त्यांनी पुढे गिरगाव चौपाटीवरील ‘मराठी रंगभूमी दालन’ रद्द करण्याचा निर्णय, मराठी भाषा भवनामध्ये इतर कार्यालयांना जागा देणे, आणि भाषा भवनाच्या कामात होणारा विलंब यांचा उल्लेख करत भाजपवर गंभीर आरोप केले.
“मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द करणे, स्थानिकांचा विरोध नसताना हा निर्णय घेणे, आणि हे सगळे कोणासाठी? स्थानिक भाजप आमदारासाठी की कुठल्या बिल्डर मित्रासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्र द्वेष्टे भाजप या प्रश्नांची उत्तरे देणार का? आणि आपण मुंबईकर त्यांच्या खेळाला वेळेत ओळखणार का?” असा स्पष्ट इशाराही त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी दिला. Aditya Thackeray
The issue of compulsory Hindi has heated up; Aditya Thackeray accuses BJP of having a ‘Marathi hate agenda
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी