Prakash Ambedkar : लग्न नाही तत्पूर्वीच नवरा – नवरी एकत्र संसार करायला लागलेत, दोन्ही राष्ट्रवादींवर प्रकाश आंबेडकर यांचा टोला

Prakash Ambedkar : लग्न नाही तत्पूर्वीच नवरा – नवरी एकत्र संसार करायला लागलेत, दोन्ही राष्ट्रवादींवर प्रकाश आंबेडकर यांचा टोला

Prakash Ambedkar

विशेष प्रतिनिधी

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे लग्न अजून झाले नाही. परंतु तत्पूर्वीच नवरा – नवरी एकत्र संसार करायला लागलेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट भविष्यात एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये असे मत व्यक्त केले होते. यासंबंधीचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा असल्याचेही म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष लवकरच राजकारणात एकत्र येतील असा दावा केला जात आहे.

याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत. पण त्यात कुठेही शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत नाही. अजित पवार हेच या निवडणुका पूर्णपणे हाताळत आहेत. अजून लग्नही झाले नाही, परंतु नवरा – नवरी एकत्र संसार करायला लागलेत.

पाकिस्तानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजू मांडण्यासाठी केंद्राने परदेशात पाठवलेल्या पाकविरोधातील खासदारांच्या शिष्टमंडळावरून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले , पंतप्रधान मोदी सगळ्या देशांना जाऊन आले, पण युद्धामध्ये एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला नाही. जिथे पंतप्रधान मोदी प्रभाव पाडू शकले नाही तिथे खासदारांचे प्रतिनिधी मंडळ काय करेल, चर्चा करतील पण हे शक्ती आणि संसाधन वाया घालवण्याचे काम आहे. Prakash Ambedkar

There is no marriage, but the husband and wife started living together, Prakash Ambedkar attack on both the nationalists

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023