विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ऑफर फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना असल्या टिपल्या-टोचक्या मारण्याची सवय आहे. ते टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यामुळे त्यावर फारसा विचार करत नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना काल निरोप देण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ‘उद्धवजी तुम्हाला इकडे यायचा ‘स्कोप’ आहे, अशी थेट ऑफर दिली. त्यावर संजय राऊत म्हणाले, सध्या फडणवीस यांच्या बाजूला डुप्लिकेट लोक बसलेले आहेत. त्याचा फडणवीस यांनी अधिक विचार करावा. शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि चिन्ह यासाठी एक लढा देत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला खात्री आहे की, न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. फडणवीस यांच्यासोबत शिवसेना म्हणून डुप्लिकेट लोक बसलेले आहेत. त्यांचा विचार फडणवीस यांना अधिक करावा लागेल. आपल्या सोबत डुप्लिकेट ठेवायचे की असली शिवसेना ठेवायची आहे. सध्या फडणवीसंचा कारभार डुप्लिकेट लोकांना सोबत घेऊन सुरू असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
जकारण आणि बहुमत हे फार चंचल असते. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन युद्ध थांबवतील वाटलं होतं का? लाहोर, कराची, इस्लामाबादवर तिरंगा फडकवून मोदी शांत बसतील, असं वाटलं होतं. आता काय झालं? हे पाहतोय, असेही राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रात राहून मी मराठी बोलणार नाही, ही मस्ती कशी सहन करावी? काल ममता बॅनर्जी किंवा आसामचे मुख्यमंत्री बोलले की माझ्या राज्यांमध्ये तेथीलच भाषा चालले. तिथे कोणी असे बोलत नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये असे प्रश्न विचारले जातात. तुम्ही एक ठिकाणी रोजी रोटी साठी येतात. आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी येतात. यापैकी अनेकांची कुटुंब वेगवेगळे राज्यामध्ये आहेत. आम्ही तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतो. आमचं मन विशाल आणि मोठे आहे. तरी मस्ती कशा करता करता?
दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉगच्या बैठकी संदर्भात हालचाली सुरू आहेत. इंडिया आघाडीची बैठक घ्यावी, अशी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती. त्याच्या तारीख संदर्भात देखील चर्चा सुरू आहे. सध्या 19 तारीख ठरवली आहे. मात्र ती किती जणांना सोयीचे आहे ते पाहावे लागेल. मात्र इंडिया आघाडीची बैठक लवकरच होत आहे. त्याची तारीख ठरल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा जाहीर होणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले.
There is no need to take the offer made by Devendra Fadnavis seriously, Sanjay Raut clarified
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला