विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aaditya Thackeray जे लोक सत्याला घाबरतात, ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्याच्या या लढ्यात गुन्हे दाखल होणार हे माहित होते. ‘व्होट चोरी’ करून हे लोक डोक्यावर बसले असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.Aaditya Thackeray
मतदार यादीतील कथित घोळ आणि मतचोरी विरोधात शनिवारी महाविकास आघाडी आणि मनसेने मोर्चा काढला होता. या प्रकरणावरून आता या सर्व नेत्यांवर आणि आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चा आणि आंदोलन करण्यासाठी आवश्यक परवानगी न घेतल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आझाद मैदान पोलिस ठाणे आणि झोन 2 मधील डी.बी. मार्ग पोलिस ठाण्यात या मोर्चाच्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.Aaditya Thackeray
शिवसेना शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, आमच्या कुटुंबाच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. हे इतरांसोबत झाले तर नेमके काय होईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री काल आले असते तर आम्हाला आवडले असते. जे आमदार पळून गेले किंवा ज्यांना वाटले सगळ्यांना मिळेल पण आता सत्य समोर यायला लागले आहे. पण ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांनी आता स्वतःचे चेहरे आरशात पाहावे.
They’ve Come to Power by Stealing Votes,’ Alleges Aaditya Thackeray
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
- चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
- पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
- शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा



















