विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यामध्ये सध्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरुन राजकारण रंगले आहे. शिवसेना ठाकरे गटातून बडतर्फे करण्यात आलेलेल बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. नाशिकच्या स्थानिक नेत्यांकडून देखील या पक्षप्रवेशाला विरोध केला जात आहे. आता सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश होत असल्यामुळे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नितेश राणेंना डिवचले आहे.
सुधाकर बडगुजर हे 2023 या वर्षी देखील चर्चेमध्ये आले होते. त्यांचा अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे दिसून आले होते. सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता सोबत नाचताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन भाजप नेते बडगुजर यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. यामध्ये प्रामुख्याने आशिष शेलार आणि नितेश राणे यांचा समावेश होता. नितेश राणे यांनी 2023 मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करुन टीका होती. याचवरुन आता खासदार संजय राऊत यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले आहे. Sanjay Raut
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नितेश राणे यांची विधानसभेमधील हिवाळी अधिवेशनाची व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये ते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. यावर संजय राऊतांनी राणेंना टोला लगावला आहे. त्यांनी लिहिले की, ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट ..”झाला रे… बॉम्ब ब्लास्ट मधील सलीम कुत्ता चे बॉस भा ज पा मध्येच बसलेत! असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.
या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे!गृह मंत्री फडणवीस तुमचे लोक त्या सलीम कुत्ता ला उगाच बदनाम करीत होते; भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज लोकांचा भरणा असलेला पक्ष आहे देशभक्ती, हिंदुत्व वगैरे सगळे ढोंग आहे! sa आरोपही राऊत यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये केला आहे. Sanjay Raut
ह्याचा आज खऱ्या अर्थाने “पोपट ..”
झाला रे…
बॉम्ब ब्लास्ट मधील सलीम कुत्ता चे बॉस भा ज पा मध्येच बसलेत!@Dev_Fadnavis @cbawankule @PMOIndia https://t.co/jyKFfGEb6J— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2025
Today, he has truly become a “parrot…”; Sanjay Raut once again mocks Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी