विशेष प्रतिनिधी
मुंबई : Yogesh Mhase नागपूरच्या आयुक्त पदावरून डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांना आता पुणे महानगर विकास प्राधिकारणावर पाठवण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाचे आयुक्त योगेश म्हसे यांची बदली करत त्यांना मंत्रालयातील अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.Yogesh Mhase
योगेश म्हसे हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला होता. या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला गेला आणि मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. आता योगेश म्हसे यांची बदली अल्पसंख्यांक विकास विभागात करण्यात आल्याने चर्चा सुरू झाली आहे.Yogesh Mhase
दरम्यान, 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची नागपूर महानगरपालिका आयुक्त पदावरून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तातडीने लागू करण्यात आलेल्या या आदेशानुसार, चौधरी हे योगेश म्हसे यांच्याकडून पदभार स्वीकारतील, तर म्हसे यांची नियुक्ती मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नसून, या रिक्त पदावर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Two IAS Officers Transferred in Maharashtra; Abhijit Chaudhary Posted to Pune, Yogesh Mhase Made Secretary
महत्वाच्या बातम्या
- Raju Shetti : आंबा व काजू उत्पादकांना मदत द्या अन्यथा धडक मोर्चा, राजू शेट्टी यांचा इशारा
- Shri Rasiklal Dhariwal : श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
- Brought back citizens : दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मदतीने पुणेकर पर्यटक मायदेशी परतले! एकनाथ शिंदेचे मानले आभार…