विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray २०१२ ला आपण इथं गाऱ्हाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर होऊ दे. त्यानंतर सुनील प्रभू महापौर झाले. पुढचं मी सांगत नाही, पण तसंच गाऱ्हाणं आताही आपल्या देवाला घातलेलं आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी मागाठाणे येथील मालवणी महोत्सवाच्या व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. यावेळी उद्धव ठाकरेंनी २०१२ च्या आठवणींना उजाळा देत येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर व्हावा, यासाठी देवाकडे गाऱ्हाण घातलं.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मागाठाणे येथील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत केली. ते म्हणाले, मला विश्वास आहे बाकी कोणी ऐकू न ऐको, पण देव आपलं ऐकतो. मी मनापासून बोलतोय, खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केवळ उत्साही न राहता राजकीय परिस्थितीबद्दल जागरूक आणि सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले. आपला मोर्चा झाला. त्यामुळे सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. अन्यथा मुंबईत जेवढे दिसतोय, तेवढे पण पुढील पाच वर्षात दिसणार नाहीत. जुने कार्यकर्ते या ठिकाणी दिसतायत. अजूनही काही आपली माणसं धडपड करत आहेत. संघर्ष म्हटला की मराठी माणूस मागे हटत नाही. अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. तीच जिद्द आणि हिंमत आपल्याला वेतोबाने दिलेली आहे.
Uddhav Thackeray Appeals to Vetoba of Magathane Over Mumbai Mayor Post
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
- चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
- पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
- शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा



















