विशेष प्रतिनिधी
मुंबई :Uddhav Thackeray मुंबई महापालिका समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता इंडिया आघाडीची बैठक राजधानी दिल्लीत होणार असून उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत.Uddhav Thackeray
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने आता बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहोचणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भोजनाचे निमंत्रण देखील असल्याची माहिती आहे.Uddhav Thackeray
इंडिया आघाडीची बैठक 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहोचणार आहेत. तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार दिल्लीतच आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेतली जाणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.
महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्याचसोबत इंडिया आघाडीचे इतर राज्यातील प्रमुख नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने इंडिया आघाडीचे सर्वच प्रमुख नेते सध्या दिल्लीतच आहेत. त्यामुळे या बैठकीला सर्वच नेते उपस्थित असणार आहेत.
Uddhav Thackeray to go to Delhi for India Aghadi meeting, will have lunch with Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!