विशेष प्रतिनिधी
Mumbai News: उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) शॉर्टफॉर्म ‘युटी’ आहे. म्हणजेच ‘यूज एण्ड थ्रो’… मी असे म्हणू का.. वापर आणि फेकून द्या, ही त्यांची निती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे? मला शांतपणे काम करूद्या, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
उबाठा’ आणि ‘एसंशिं’वरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात जुंपली आहे. उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘उबाठा’ असा केला जातो. पण, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘एसंशिं’ ( एकनाथ संभाजी शिंदे ) असा केला जात आहे.
ठाकरेंकडून करण्यात येत असलेल्या ‘एसंशिं’ उल्लेखावरून एकनाथ शिंदे संतापले आहेत.“माझा गद्दार, गद्दार, खोके, खोके म्हणून उल्लेख केला. पण, तुम्हाला जनतेने खोक्यात बंद करून टाकले. 100 पैकी फक्त 20 आमदार निवडून आले. काही आमच्या लोकांच्या चुका झाल्यामुळे हेही निवडून आले. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 निवडून आणले. गद्दार कोण आणि खुद्दार कोण, हे जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
Uddhav Thackeray’s ‘Use and Throw’, Eknath Shinde’s Counterattack
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray उध्दव ठाकरे गोंधळलेत, काय बोलावे सुचेना, एकनाथ शिंदे यांचा टोला
- Chandrashekhar Bawankule’ : किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल
- Praveen Tarde पुणेकरांचा लाडका मुरलीधर, प्रवीण तरडे यांनी केले जिवलग मित्राच्या भाषणाचे कौतुक
- Uddhav Thackeray: तुम्ही बच्चे होता तेव्हा, आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका, उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर