विशेष प्रतिनिधी
मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अटक व्हावेत व न्याय मिळावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे गावकरी अन्न त्याग आंदोलन करत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी यासोबतच उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे फायदा होईल, लवकरच चार्च शीट फाईल होणार आहे, त्यातही त्यांचा सल्ला महत्वाचा ठरेल अशी भावना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
Ujjwal Nikam Special Public Prosecutor in Santosh Deshmukh murder case
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…