विशेष प्रतिनिधी
मुंबई: Rupali Chakankar अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल होणारे व्हिडीओ हे अनेक वर्षांपूर्वीचे सांगताना त्या म्हणाल्या, माध्यमांमध्ये दाखवले जाणारे व्हिडीओ हे पाच ते सहा वर्षांपूर्वीचे आहेत.Rupali Chakankar
चाकणकर म्हणाल्या, गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजा करण्याची परंपरा असल्याने आम्हीही ती केली होती. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या पुढील आयुष्यातील वर्तनाबाबत त्या वेळी कोणालाही माहिती नसते. खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा त्याच्या कथित कृत्यांबाबत मला कोणतीही माहिती नव्हती. ही घटना समजल्यानंतर मलाही धक्का बसला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देत उच्चस्तरीय तपासाची मागणी केली आहे.Rupali Chakankar
चाकणकर यांनी स्पष्ट केले की त्या शिवनिका संस्थानच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या, मात्र त्यांचा कार्यकाळ ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपला आहे. “समाजात अनेकजण कोणाला तरी गुरु मानतात. माझ्या कुटुंबाने आणि मीही खरात दाम्पत्याला गुरु मानले होते. महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा अशा कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहत होतो,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नाशिकमधील स्वयंघोषित बाबा अशोक खरात याला अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि राजीनाम्याची मागणी केली होती.
या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.
“Viral Videos Are Old, Unaware of Kharat’s Actions: Rupali Chakankar Clarifies
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास