विशेष प्रतिनिधी
मुंबई : मतदार याद्यांमधील घोळ, आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा असल्याकारणाने या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव देण्यात आले आहे. पण या मोर्चाच्या माध्यमातून खोट्या मतदारांना इशारा देण्यात येत आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज शनिवारी महाविकास आघाडी आणि मनसे मोर्चा काढणार आहे. दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून निघणार असून तो मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला थांबणार आहे.
या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपा नेते मूक मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढावा, आम्ही बोलका मोर्चा काढतो, असा टोला नांदगावकरांनी लगावला.
बाळा नांदगावकर म्हणाले की, लोकशाहीचा आणि संविधानाचा गजर आणि जागर असणारा हा मोर्चा आहे. खऱ्या मतदारांच्या सन्मानाचा हा मोर्चा आहे आणि खोट्या मतदारांना सावधानतेचा इशारा देणारा हा मोर्चा आहे. या मोर्चामध्ये केवळ विरोधी पक्षांनी नाही तर सत्ताधारी पक्षातील लोकांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांना वाटत नाही का की, मतदार याद्या स्वच्छ असल्या पाहिजेत. स्वच्छ वातावरणात निवडणुका पार पडल्या पाहिजेत. आमची तीच भूमिका आहे, की याद्यांमध्ये असलेला घोळ जो आम्ही निदर्शनास आणून दिला आहे. तो घोळ क्लिअर करा, याद्या स्वच्छ करा आणि निवडणुका घ्या.
आम्ही निवडणूक आयोगावर मोर्चा काढत आहोत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत. त्यामुळे खरं तर सत्ताधारी पक्षातील लोकांनी या मुद्द्यावरून आमच्यासोहबत असले पाहिजे. सत्ता आज असते, उद्या नसते. हेच आरोप पूर्वी काँग्रेस सत्तेत असताना आम्ही करत आहोत. तेच आरोप आता पुन्हा आम्ही करत आहोत. पण काँग्रेस सत्तेत नाही तर विरोधात आहे आणि जे विरोधात होते, ते आता सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांना हे आरोप खोटे वाटत आहेत. आता पाऊस जरी असला तरी लोकांनी आजचा मोर्चा होणारच असा निर्धार केला असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
भाजपाकडून मूक आंदोलन जरी होत असले तरी मी रवींद्र चव्हाण, अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांना इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करू इच्छितो की, तुम्ही मूक मोर्चा करणार असाल तर तो आमच्यासोबत येऊन करा, आम्ही बोलका मोर्चा करतो. तुमचे स्वागत आहे. पण विषय एकच आहे की निकोप निवडणुका व्हाव्यात. त्याच्यावर अन्य कोणताही विषय नाही, असे बाळा नांदगावकर यांनी यांनी स्पष्टपणे सांगत सत्ताधाऱ्यांना सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Warning to fake voters through the march, Bala Nandgaonkar says that the ruling party should also come along
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















