विशेष प्रतिनिधी
मुंबई :Navnath ban लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण त्यांचा पक्ष लोकशाहीवर नाही तर घराणेशाहीवर चालतो, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांना कुठेच मान्यता नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने काम करत आहे, त्यासाठी ते रोज राहुल गांधींना सल्ले देतात. उबाठा खड्ड्यात घातल्यानंतर आता काँग्रेस खड्ड्यात घालण्याचे काम राऊतांकडून करण्यात येणार आहे, असा टाेला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मारला.Navnath ban
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुम्ही लुटारू सैनिक आहात हे जनतेने पाहिले आहे. तुम्ही महाराष्ट्र, मुंबई, पत्राचाळीची लुट केली. तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करू नका. तुम्ही लुटारू सैनिक आहात. राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांना विनंती केली आणि ती मान्य केली. तर लक्ष्णण हाके यांनी विनंती दत्ता भरणे यांची विनंती मान्य केली. ही काय धमकी नाही. आम्ही लोकांना साथ देतो म्हणून लोकं आमची विनंती मानतात.Navnath ban
नवनाथ बन म्हणाले की, राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला साथ देण्याचे काम केले आहे.त्यांचे मी आभार व्यक्त करतो. काल रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली, यावेळी राहुरीच्या विकासासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनी लोकशाही कुठे आहे, आणि ट्रम्प शाही कुठे आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तुमच्या कार्यकाळात राज्याची वाट लावली तेव्हा तुम्हाला लोकशाहीची आठवण झाली नाही का? असा सवाल बन यांनी केला आहे.
What right do those who run a party Navnath ban on dynastic principles have to speak on democracy? BJP’s Sanjay Raut slams
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर