विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? आणि गृहखाते या आकाच्या मुसक्या का आवळत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. Rohit Pawar
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूडजवळील दुधोडी फाटा येथे खाजगी पवनऊर्जा प्रकल्पावर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली. यामुळे पुन्हा एकदा पवनचक्की माफियांकडून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेची दखल घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. Rohit Pawar
पवार यांनी ट्वीट करत खळबळजनक दावा केला आहे. “महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होत आहे. यापूर्वी दहशत माजवणाऱ्या एका आकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट धाराशिवपर्यंत मजल मारली आहे. त्याच्या टोळीने धाराशीवमध्ये पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून धुमाकूळ घातला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून प्रचंड दहशत माजवली आहे. त्याच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही,” असा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिसांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. त्यामुळे या नवीन आकाच्या मुसक्या कधी आवळणार? असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये पाथरूडजवळील दुधोडी फाटा येथे खाजगी पवनऊर्जा प्रकल्पावर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पवनचक्की कंपनीच्या 11 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तर, काही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हल्लेखोरांच्या हातात तलवारी, लोखंडी साखळ्या, लाठ्या असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा हल्ला खंडणीसाठी करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून पवनचक्की व्यवस्थापनाकडून गुन्हा दाखल झाला नसल्याने चर्चा होत आहेत.
Who is the third Aaka to be formed in Dharashiv after Beed and Sangli? Rohit Pawar’s question
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात ! उदित राज यांच्या विधानावरून संताप
- नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ थेट जनतेशी थेट संवाद साधणार
- अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास, कोकाटे यांनी फेटाळली राजीनाम्याची चर्चा
- मंत्र्यांचा राजीनामा, संजय शिरसाट म्हणाले सामनामध्ये बातमी आली याचा अर्थ कधीच होणार नाही!