PM Narendra Modi : मुंबई दहशदवादी हल्ल्यानंतर कोणाचा दबाव होता? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल

PM Narendra Modi : मुंबई दहशदवादी हल्ल्यानंतर कोणाचा दबाव होता? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल

PM Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : PM Narendra Modi  मुंबई दहशदवादी हल्ल्यानंतर कोणाचा दबाव होता? पाकिस्तानला उत्तर का दिले नाही? मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय का दिला नाही? दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले? असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काँग्रेसला केला.PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात आले आहे. यावेळी बाेलताना काॅंग्रेसवर हल्लाबाेल करताना माेदी म्हणाले, आता काँग्रेसला हे सांगावे लागेल की, ते कोण होते? ज्यांनी विदेशी दबावांमध्ये निर्णय घेतला. ज्यांनी मुंबई आणि देशाच्या भावनेसोबत खेळ खेळला. देशाला हे जाणून घेण्याचा हक्क देखील आहे. काँग्रेसच्या या कमजोरीमुळे दहशतवाद्यांना मजबूत केले. देशाच्या सुरक्षेला कमजोर केले. याची किंमत देशाला वारंवार चुकवावी लागली आहे. आमच्यासाठी देश आणि देशाची सुरक्षा या व्यतिरिक्त काहीच मोठे नाही. आजचा भारत दमदार प्रत्युत्तर देतो. आजचा भारत घरात घुसून मारतो. हे जगाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिले देखील आहे. याचा सर्वाना गर्व आहे.

2008 मध्ये दहशतवाद्यांनी मुंबई शहर हे मोठा हल्ला करण्यासाठी निवडले. मात्र त्यावेळी काँग्रेसचे सरकार सत्तेमध्ये होते. त्यांनी कमजोरीचा संदेश दिला. दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले असल्याचा संदेश दिला. नुकतेच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने, जे देशाचे गृहमंत्री देखील होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये खूप मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, मुंबई हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार होते. पूर्ण देशाची देखील त्यावेळी हीच इच्छा होती. मात्र त्याच काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, कोणत्या दुसऱ्या देशाच्या दबावामुळे त्यावेळी काँग्रेस सरकारने भारतीय सैनिकांना पाकिस्तानवर हल्ला करू दिला नाही.

Who was under pressure after the Mumbai terror attacks? PM Narendra Modi questions Congress

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023