विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेगवेगळे मोर्चे काढण्याची घोषणा केली. आधी उद्धव ठाकरे यांनी 7 जुलैला तर त्यानंतर राज ठाकरे यांनी 5 जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेत केली. मात्र आता दोघा भावांचा एकत्रित मोर्चा निघण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे सूचक ट्विट केले. Sanjay Raut
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी दोन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र असलेला फोटो शेअर केला आणि म्हटले की, “महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल.” Sanjay Raut
गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र येणार का? याची चर्चा सुरु होती. पण, दोघांकडूनही अनेकदा संकेत देण्यात आले पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यानंतर राज्य सरकारने हिंदीवरून घेतलेल्या निर्णयानंतर दोन्ही पक्षांनी विरोध दर्शवला आणि मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी थोड्याच मिनिटात दुसरे ट्वीट केले. यामध्येही दोन्ही भावांचा एकत्र फोटो शेअर करत ठाकरे हा ब्रँड असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे किमान मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांच्या ट्वीटवर एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “महाराष्ट्रातील मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणे सध्या गरजेचे आहे. मराठी माणसाची ताकद एकत्र दिसावी असे आव्हान राज ठाकरे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. त्या आव्हानाला सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जेव्हा हा मोर्चा निघेल तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ऐतिहासिक मोर्चा असेल. ज्या पद्धतीने मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे, अशावेळी मराठीसाठी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एकत्र येऊन हा एकच मोर्चा निघेल. 5 जुलैला होणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे.” Sanjay Raut
Will Raj – Uddhav Thackeray come together? Sanjay Raut presented this position
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी