Devendra Fadnavis : नारीशक्तीला प्रत्येक हक्क, प्रत्येक न्याय आणि प्रत्येक सन्मान मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis आमच्यासाठी महिला सशक्तीकरण फक्त भाषणांचा विषय नाही, तर एक बांधिलकी आहे. उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू आणि आपल्या नारीशक्तीला प्रत्येक हक्क, प्रत्येक न्याय आणि प्रत्येक सन्मान मिळवून देऊ,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.Devendra Fadnavis

मोदी सरकारने महिला आरक्षण आणि परिसीमन संबंधित तीन विधेयके लोकसभेत सादर केली. लोकसभेमध्ये या घटनादुरुस्ती विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेतल्यानंतर बाजूने 298 मतदान झाले, तर विरोधात 230 मते नोंदवली गेली. हे विधेयक पारित करण्यासाठी दोन तृतीयांश मतदान असणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने हे विधेयक कोसळले. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी प्रगतीपेक्षा राजकारणाला प्राध्यान्य दिल्याचे म्हटले.Devendra Fadnavis



विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “देशाने आज विरोधकांची नौटंकी पाहिली. आपल्या नारीशक्तीच्या बाजुने उभे राहण्याची ऐतिहासिक संधी विरोधकांकडे होती, पण त्यांनी ती गमावली. विरोधक हे महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने फक्त भाषणांमध्ये आणि घोषणांमध्येच अस्तित्वात आहेत. म्हणूनच प्रगतीपेक्षा त्यांनी राजकारणाला प्राधान्य दिले.” असे म्हणत त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. तसेच ते पुढे म्हणाले की, “नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून त्यांनी नेमके कोणाच्या हितासाठी काम करतात? हे स्पष्ट केले. भारताच्या महिला हे सगळे पाहत आहेत आणि त्या हे विसरणार नाहीत. पण, आमच्यासाठी महिला सशक्तीकरण फक्त भाषणांचा विषय नाही, तर एक बांधिलकी आहे. उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू आणि आपल्या नारीशक्तीला प्रत्येक हक्क, प्रत्येक न्याय आणि प्रत्येक सन्मान मिळवून देऊ,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आज लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर होणे हे दुर्दैवी आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीने गरिब, आदिवासी, मागास, अनुसूचित जाती-जमातीतील माता-भगिनींना संसदेत येऊ न देण्यासाठी महिला-विरोधी भूमिका घेतली. शिवसेना याचा तीव्र शब्दांत निषेध करते.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. तसेच ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी एक ऐतिहासिक प्रयत्न केला होता. पण, विरोधकांचा महिलांप्रती असलेला आकस आज दिसून आला. त्यांचा खरा आणि दुष्ट चेहरा आज समोर आला. हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल. आता येणाऱ्या काळात देशातील आमच्या लाडक्या बहिणींचे रौद्र रूप विरोधकांना पाहायला मिळणार आहे,” असे म्हणत इशारा दिला.

Will take to streets for women’s rights, warns cm Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या