विशेष प्रतिनिधी
मुंबई : पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केलेत त्यामुळे पक्षप्रमुख नव्हे तुम्ही ‘कट’ प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही असे सांगितले.
शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे म्हणाले, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना पंतप्रधान मोदीजी यांनी जशास तसे उत्तर दिले. तर आपल्याच सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पाकिस्तानला हेडलाईन्स देण्याचे काम तुम्ही केलेत, त्यामुळे तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये व्हायला हवा होता. पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे, आतंकवाद्यांकडून प्रचार करून घेणारे, त्यांच्या कबरी सजवणारे तुमचे हिंदुत्व हे बेगडी असल्याचा घणाघात केला.
पूरग्रस्तांना मदतीवरून होणाऱ्या टिकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, फोटो दिसतात पण, त्याच्या आत असलेली मदत दिसत नाही. त्यामध्ये पीडितांना ३५ प्रकारचे साहित्य दिले आहे. तुम्ही बिस्किटचा पुडा तर दिला का? पाहाणी करण्यासाठी एकनाथ शिंदे जाण्यापूर्वी मदतीचे ट्रक गेले होते. आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची पथके गेले होती.शिवसैनिकांना केलेल्या आवाहनानुसार त्यांनी या पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांचे घर पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. अशा शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे.
यंदा बळीराजाचे दुःख मोठे आहे. मात्र अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीचा हात देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. ‘जिथे संकट तिथे हा एकनाथ शिंदे प्रकट’ हे समीकरण असून यावेळीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख पाहिले असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, या महापुराच्या तडाख्यात बळीराजा कोलमडला असला तरीही सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. अटी शर्ती बाजूला ठेवून त्याला मदतीचा हात दिला जाईल काहीही झाले तरी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.
राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्यांचा मुलामुलींची लग्न लावून देण्यास अडचणी आल्यास ही जबाबदारी शिवसेना घेईल असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आगामी वर्ष हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने वर्षभर हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा केला जाईल असेही याप्रसंगी सांगितले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निवडणुका असल्याने प्रत्येक संस्थेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी शिवसैनिकांना केले.
“कोणीही आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचीच राहणार आहे. निवडणुका जवळ आल्याने तुम्ही हे बोलत आहे. पण, तुमच्यावर आता कोणी विश्वास ठेवणार नाही. जो मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे, त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शिवसैनिक करणार आहे.”
you will not even remain a shadow: Eknath Shinde’s attack on Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















