विशेष प्रतिनिधी
पुणे : पुरंदर तालुक्यात हाेणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला काही गावांतील शेतकरी विराेाध करत आहेत. काही राजकीय नेत्यांनी विमानतळाच्या परिसरात जमीनी घेतल्याचा आराेपही हाेत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या आजूबाजूला तुमची १२० एकर जमीन आहे, असा आराेप ग्रामस्थांनी केला आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादनासाठी ड्राेन सर्व्हेक्षण सुरू आहे. ग्रामस्थांनी त्याला विराेध करण्यासाठी आंदाेलन केले. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, “कुंभारवळण गावी मी सोमवारी गेले होते. नागरिकांशी चर्चा करून दोन-तीन निर्णय आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून पुरंदर विमानतळ प्रश्नात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी, ती सरकारशी बोलेल, असे आम्ही ठरवले आहे. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गाडे या सर्वांशी माझं फोनवरून बोलणं झालं. सगळे नेते शेतकऱ्यांबरोबर आहेत. सरकारने अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा.
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे होत आहे. मात्र, या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यादरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सोमवारी सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळण गावाला भेट दिली. तेथील परिस्थिती आणि नागरिकांचे म्हणणे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना सांगितले.
मात्र, ग्रामस्थांनी सुळे यांची विमानतळाच्या परिसरात जमीन असल्याचा म्हटले आहे. विमानतळामुळे या जमीनीला साेन्याचा भाव येणार असल्याचा आरापे ग्रामस्थांनी केला आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता सर्व डिजिटल आहे. तलाठ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही कुणीही तपासून पाहू शकता. कुणाची जमीन कुठे आहे, हे लगेच कळते. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, विजय सुळे, रेवती सुळे, शरद पवार, प्रतिभा पवार या सहा जणांची जमीन नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते.
120 acres of your own land around the airport, villagers accuse Supriya Sule
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा