विशेष प्रतिनिधी
पुणे : Municipal Elections सध्या संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशात पुणे शहरात देखील निवडणुकीच्या दृष्टीने चांगलीच जय्यत तयारी केली जात आहे. मग त्यात अंतिम प्रभाग रचना तयार करणे, विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेने २३ विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेने आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगवान करण्यासाठी २३ विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षांच्या प्रमुखपदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांना तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. पुण्यातील महानगरपालिका निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या दोन आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Municipal Elections
६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रभागांसाठी आरक्षण जाहीर केले जाईल. तसेच एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय हालचालींना आता बऱ्यापैकी वेग येत आहे. प्रशासन देखील निवडणूकीच्या दृष्टीने जय्यत तयारीला लागले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सध्या शक्य तितके प्रयत्न करत आहे.
पुण्यातील निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे २४,००० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. त्या हिशोबानेच आतापर्यंत प्रशासनाकडून १९,००० कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उरवारीत कर्मचाऱ्यांची देखील लवकरात लवकर व्यवस्था करण्यात येणार आहे. Municipal Elections
निवडणुकीसाठी तयार केली गेलेली ही २३ विशेष कक्ष निवडणुकीशी संबंधित सर्व कामांचे कार्यक्षमतेने आयोजन आणि देखरेख करण्यासाठी आहेत. या प्रत्येक कक्षासाठी एक कक्ष प्रमुख म्हणजेच सेल प्रमुख नेमला जाईल. यातील प्रत्येक सेल प्रमुखांना थेट महानगरपालिका आयुक्तांना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या अधिकाऱ्यांना निवडणूक आयोग किंवा राज्य सरकारशी थेट संपर्क साधू नये असे देखील बजावण्यात आले आहे. सर्व संपर्क हा आयुक्तांच्या मार्फतच करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. निवडणुका पूर्ण होईपर्यंत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पुण्यातील हे कक्ष निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन, मतदान केंद्रे, पोस्टल मतपत्रिका हाताळणी, मतदान आणि मतमोजणी, स्टेशनरी वितरण, सार्वजनिक माहिती, दूरसंचार, बैठक व्यवस्था, आचारसंहिता अंमलबजावणी, गैरव्यवहार देखरेख, वाहतूक आणि वीज व्यवस्थापन, आयटी आणि ईव्हीएम व्यवस्थापन, समन्वय, कायदेशीर आणि आरोग्य सेवा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचे कामं सुरळीत चालणे यासाठी तयार करण्यात आली आहे. Municipal Elections
23 special cells set up in Pune ahead of Municipal Elections
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















