विशेष प्रतिनिधी
मुंबई : ताम्हिणी घाटात कोंडेसर गावाजळ खाजरी बसचा अपघाता झाला, यात 5 जणांचा मृत्यू झाला आणि 27 लोकं जखमी झाले. मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी सभागृहात निवेदन केले आणि मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
-अपघात कुठेही झाला तरी महाराष्ट्रातील जनता आहे त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी पार पाडले असे गोगावले म्हणाले.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले.
माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात परपल ट्रॅव्हल्सची खाजगी बस पलटी झाली. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यामधे २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत.
संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव यांच्यासह एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला आहे.