विशेष प्रतिनिधी
पुणे: Dattatreya Bharane राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 30 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. साधारण 195 तालुके बाधित झाले आहेत. तर 654 मंडळातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात प्राथमिक अंदाजानुसार 62 लाख 17 हजार 540 एकर शेती पिकाचे नुकसान झाले असून मदत लवकरच देण्यात येईल अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
ओला दुष्काळाच्या बाबतीत संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य त्यावर विचार करतील. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. आमचा बेसच शेतकरी आहे. ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना मदत करणे आणि पाठिंबा देणं आमचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. Dattatreya Bharane
दत्तात्रय भरणे म्हणाले की, अतिवृष्टीच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांचे लक्ष आहे. त्यांनी आम्हाला सूचना दिला आहे त्यानुसार पालकमंत्री जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करत आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून संपूर्ण नुकसान भरपाईच्या माध्यमामध्ये त्याला मदत केली जाईल.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे ओला दुष्काळ जाहीर करण्यावर योग्य तो निर्णय घेतील. सरकारकडून जिथे जिथे नुकसान झाले तिथे तिथे पंचनामे करण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभाग आणि कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे. Dattatreya Bharane
62 lakh acres of agricultural crops damaged in the state, Agriculture Minister Dattatreya Bharane assures help to farmers
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!