विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील गजा मारणे टोळीने केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटले आहेत. स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी कर्मचाऱ्याची व्हिडिओ कॉलवर विचारपूस केली.
कोथरूड भागात दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) या तरुणाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. श्री शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेले तिघे जण मारणे टोळीशी संबंधित आहेत.
याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जोग यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरातून बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एका मंडळाकडून श्री शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. संगणक अभियंता जोग यांना सुटी असल्याने ते दुपारी साडेचारच्या सुमारास
दुचाकीवरून खरेदीसाठी बाहेर पडले. खरेदी करून घरी जात असताना समोरून मिरवणूक येत होती. दुचाकीवरून वाट काढणाऱ्या जोग यांना तिघांनी अडविले. दुचाकी नीट चालविता येत नाही का, अशी विचारणा करून तिघांनी जोग यांना बेदम मारहाण केली. नाकावर ठोसा बसल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वडिलांना दिली. जखमी अवस्थेतील जोग यांनी कोथरुड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.
A computer engineer working in Muralidhar Mohol’s office was beaten up by a gang
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा